Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

क्रिकेट तब्बल १२८ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये परतणार, IOC ची अधिकृत घोषणा

Cricket In Olympics : क्रिकेट तब्बल १२८ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये परतणार आहे. अमेरिकेत लॉस एंजलिस येथे २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर आज ( १६ ऑक्टोंबर) सोमवारी मुंबईत शिक्कामोर्तब झालं.

ऑलिम्पिक समितीने सांगितलं की क्रिकेट, सॉफ्टबॉल, स्क्वॉश, लॅक्रॉस आणि फ्लॅग फुटबॉल या पाच खेळांचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे. बेसबॉल या स्थानिक खेळाचा ऑलिम्पिकच्या माध्यमातून प्रसार व्हावा, अशी संयोजक देशाची म्हणजेच अमेरिकेची विनंती ऑलिम्पिक समितीने मान्य केली आहे.

हेही वाचा – ‘समाजकंटक गुणरत्न सदावर्तेवर गुन्हा दाखल करा’; सतीश काळे 

स्क्वॉश हा तसा जागतिक खेळ आणि त्याच्या समावेशाविषयी अनेक वर्षे हालचाली सुरू होत्या. पण या सर्व खेळांमध्ये दर्शकव्याप्तीच्या बाबतीत क्रिकेट नि:संशय मोठा आहे. आयसीसीसह क्रिकेट खेळणाऱ्या अनेक देशांच्या प्रयत्नांनंतर आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button