breaking-newsपुणेमहाराष्ट्र
भिक्षेकारी स्वीकार केंद्रात महिला कर्मचा-याकडून ज्येष्ठ महिलेला काठीने मारहाण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/kathine-marhan.jpg)
कामावरून झालेल्या वादात 72 वर्षीय ज्येष्ठ महिलेला काठीने मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.8) सकाळी साडेसहाच्या दरम्यान येरवडा येथील शासकीय भिक्षेकारी स्वीकार केंद्रात घडली. याप्रकरणी 72 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या महिला व बालकल्याण विकास आयुक्तालय अंतर्गत येरवडा येथील शासकीय भिक्षेकारी स्वीकार केंद्रात 3 ऑगस्टला डेक्कन पोलीस स्टेशन पोलिसांमार्फत संस्थेत दाखल केले होते. तेथील एका कर्मचारी महिलेने कामावरून झालेल्या वादात या महिलेला काठीने मारहाण करून जखमी केले आहे.
महिला कर्मचा-याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.