Pimpri-Chinchwad : टँकरमधून गॅस चोरी करताना नऊ टाक्यांचा स्फोट, तीन ते चार बस जळून खाक
![Pimpri-Chinchwad: Nine tanks explode while stealing gas from tankers](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Pimpri-Chinchwad-1-780x470.jpg)
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे येथे रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली आहे. टँकरमधून गॅसची चोरी होत होती. यावेळी एका पाठोपाठ एका गॅस टाक्यांचा स्फोट झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थी आणि नागरिक या स्फोटांच्या आवाजामुळे रस्त्यावर सैरावैरा धावत सुटले. धुरांचे लूट आणि ज्वाळा काही किलोमीटरवरून दिसत होत्या, याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ताथवडे येथील जेएसपीएम महाविद्यालयाजवळ ही घटना घडली. या घटनेत तीन ते चार स्कूल बस ही जळून खाक झालेल्या आहेत. नऊ टाक्यांचा स्फोट झाल्यामुळे ताथवडे परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली.
हेही वाचा – WhatsApp वर नंबर सेव्ह न करता मेसेज करायचायं? तर ‘या’ ८ स्टेप्स फॉलो करा
Massive fire Explosion in Tathawade near Akshara Elementa.https://t.co/IORzQlbSem#wakadfire #blossomschool #jspmthathwade #akshraelementa #punenews #wakadfirenews pic.twitter.com/J7WhkLv98J
— Pune Pulse (@pulse_pune) October 8, 2023
अग्नीशमन दलाला माहिती मिळताच काही वेळात दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तासाभराच्या प्रयत्नानंतर पावणे बाराच्या सुमारास आग नियंत्रणात आली. त्यानंतर गॅसच्या टाक्यावरील कुलिंग ऑपरेशनसाठी अजून एक तास लागला.