‘सहा महिन्यानंतर स्वाभिमानानं मंत्री म्हणून फिरणार’; भास्कर जाधव यांचा निर्धार
![Bhaskar Jadhav said that after six months he will walk as a minister with self-respect](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Bhaskar-Jadhav-780x470.jpg)
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मोठं विधान केलं आहे. सहा महिन्यानंतर स्वाभिमानानं मंत्री म्हणून फिरणार, असा निर्धार भास्कर जाधव यांनी केला आहे. ते सिंधुदुर्गमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
भास्कर जाधव म्हणाले, ही लढाई आपली, तुमची आणि माझीच आहे. फक्त सहा महिने उरलेत. सहा महिन्यांनी हा भास्कर जाधव या भागात, जिल्ह्यात आणि राज्यात स्वाभिमानानं आणि सन्मानानं मंत्री म्हणून फिरेल. त्यामुळे आजपर्यंत जशी साथ दिली. तशीच साथ द्यावी.
मी जिथे उभा राहील त्याठिकाणी सगळेजण माझ्याविरोधात तुटून पडणार आहेत. मात्र, यांच्याविरोधात कुणीतरी लढलं पाहिजे. कोकणातल्या लाल मातीचा स्वाभिमान वेगळा आहे, हे लक्षात ठेवा.
हेही वाचा – शिल्पांच्या माध्यमातून ग्रामसंस्कृती, पारंपरिक खेळांची जनजागृती
शिवसेना फोडल्यानंतर भाजपानं सहा ते सात सर्वे केले. सगळ्या सर्वेत मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंचे सर्व नगरसेवक निवडून येतील. भाजपाचे फक्त २८ येतील. भाजपाचे शिवसेना धरून ४१ खासदार आहेत. पण, उद्या निवडणूक झाली, तर भाजपाचे सहा ते सात खासदार येतील, असा अहवाल आहे, असंही भास्कर जाधव म्हणाले.