गणेशाच्या तुटलेल्या दातामागचे कारण काय? तुम्हाला माहित आहे का?
Ganesh Utsav 2023 : जगभरात गणपती बाप्पाची वेगवेगळी नावं आहेत. भक्त बाप्पाला गजानन, विघ्नहर्ता, गणपती, एकदंत, सिद्धीविनायक, गणेशा आणि गौरी पुत्र या नावांनी संबोधतात. मात्र आपल्याला माहितीये का की, गणेशाच्या तुटलेल्या दातामागचे खरे कारण काय?
प्रचलित समजुतीनुसार, जेव्हा महर्षी वेद व्यास महाभारत लिहिण्यासाठी प्रतिभावान लेखक शोधत होते, तेव्हा गणेशजींनी त्यास होकार दिला. पण त्यांनी एक अटही घातली की जोपर्यंत महर्षी न थांबता बोलतात तोपर्यंत ते सतत लिहीत राहतील. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून वेदव्यासांनी महाभारताची कथा सांगण्यास सुरुवात केली. गणेशजी सलग १० दिवस कथा लिहीत राहिले.
हेही वाचा – ‘एकनाथ शिंदेना हटवल्यास भाजपला परिणाम भोगावे लागतील’; बच्चू कडू यांचा इशारा
महर्षि वेदव्यास गणेशांना महाभारताची कथा सांगत होते. लिहिताना अचानक गणेशजीं लेखणी फुटली. त्यांना वाटले की नवीन लेखणी शोधायला वेळ लागेल आणि कथा लिहिण्याचा क्रम खंडित होईल, म्हणून त्यांनी आपला एक दात तोडला आणि तो लेखणी म्हणून वापरला.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. आम्ही अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.