‘सुभेदार’च्या ट्रेलरने रचला नवा विक्रम! चिन्मय मांडलेकरने शेअर केली पोस्ट
मुंबई : शिवराज अष्टक मालिकेतील ‘सुभेदार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटाचे कथानक सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. ७ ऑगस्टरोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यावर अवघ्या दोन दिवसांत या ट्रेलरने नवा विक्रम रचला आहे.
‘सुभेदार’ चित्रपटाच्या ट्रेलरला अवघ्या दोन दिवसांत २ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मराठी भाषेत अशी कामगिरी करणारा ‘सुभेदार’ हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. या संदर्भात अभिनेता चिन्मय मांडलेकरने पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
हेही वाचा – चांदणी चौक कोंडीमुक्त होणार! नितीन गडकरींच्या हस्ते होणार उद्घाटन
आपल्या #सुभेदार ट्रेलरला अवघ्या २ दिवसांत २ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूजचा विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे..🚩
तुम्हा सर्वांचे अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार..!
आता भेट १८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात.https://t.co/EaQwC77Ugw#Subhedar18August @subhedarthefilm #Subhedar@DigpalOfficial… pic.twitter.com/nbYFIl16dq— Everest Entertainment (@EverestMarathi) August 10, 2023
आपल्या सुभेदारच्या ट्रेलरला अवघ्या २ दिवसांत २ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूजचा विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. तुम्हा सर्वांचे अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार..! आता भेटूया १८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात, असं अभिनेता चिन्मय मांडलेकरने म्हटलं आहे.
दरम्यान, ‘सुभेदार’ चित्रपट येत्या १८ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, स्मिता शेवाळे, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.