‘देवेंद्र फडणवीसाचं उत्तर गोलमाल’, औरंगजेबच्या वादावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया; म्हणाले..
मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात औरंगजेबवरील वादावरून प्रचंड गदारोळ झाल्याचं पाहायला मिळाला. भाजप आमदार नितेश राणे यांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावरून अबू आझमी यांनी प्रश्न उपस्थित केला. औरंगजेबचे स्टेटस ठेवलं म्हणून मुस्लीम तरूणांना अटक झाली, ते ठीक आहे. पण प्रकाश आंबेडकर औरंगजेबच्या कबरीवर फुलं वाहून आले. तसेच कुणाच्यात हिंमत असेल तर मला अटक करून दाखवावी, असं आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी दिलं. तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. राज्यात दोन वेगवेगळ्या कायदा व्यवस्था आहेत का? असा सवाल अबू आझमी यांनी केला.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
प्रकाश आंबेडकर जेव्हा औरंगजेबच्या कबरीवर गेले होते, तेव्हा मी त्यांना विनंती केली होती की, तुम्ही कबरीवर जाऊन महिमामंडन करू नका. दोन धर्मात तेढ निर्माण करणं हा गुन्हा आहे, औरंगजेबच्या कबरीवर जाणं हा गुन्हा नाही. ज्याप्रकारे काही युवक व्हॉट्सअॅपवर औरंगजेबाचा स्टेटस ठेवून हाच तुमचा बाप आहे, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या सभागृहातील उत्तरावर प्रकाश आंबेडकरांनी आक्षेप घेतला आहे.
हेही वाचा – पाकिस्तानी सीमा हैदर आणि सचिनला चित्रपटात काम करण्याची ऑफर
काल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहने आणि पोस्ट ठेवणे यासंदर्भात मुद्दा उपस्थित करून चर्चा करण्यात आली. अबू आझमी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर गृहमंत्री @Dev_Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी जे उत्तर दिलं ते गोलमाल उत्तर आहे, खऱ्या अर्थाने त्यांनी… pic.twitter.com/tpWFLqFyU5
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 3, 2023
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहने आणि पोस्ट ठेवणे यासंदर्भात मुद्दा उपस्थित करून चर्चा करण्यात आली. अबू आझमी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे उत्तर दिलं ते गोलमाल उत्तर आहे, खऱ्या अर्थाने त्यांनी उत्तर दिले पाहिजे की देशात कुणाच्याही मजारीवर, कबरीवर जाण्यास बंदी आहे का? याचा खुलासा करावा. कुणाचं काय मत आहे हा वेगळा भाग आहे पण, कायद्याने बंदी असेल तर ते सांगावं. आणि कायद्याने बंदी नसेल तर त्याचाही त्यांनी खुलासा करावा.