पाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड: प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात पालक सभा उत्साहात

प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल : प्राचार्या सविता ट्रॅविस यांचे मार्गदर्शन

पिंपरी: कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान  शाखेच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पालक सभा घेण्यात आली. उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पालक सभा दोन टप्प्यात आयोजित करण्यात आली. पहिल्या टप्प्यात कला, वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या पालक सभेत प्रमुख पाहुण्या प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सविता ट्रॅविस यांनी आपल्या मार्गदर्शनात पालकांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधत पालकांचा मुलांशी होणारा संवाद कसा असावा याविषयी प्रात्यक्षिक स्वरूपात सांगितले. मुलांना प्रोत्साहन देत अभ्यासाची जाणीव करून द्यावी व मुलांना पूर्व नियोजन करून काम करण्याची सवय लावावी असे अनेक महत्त्वाचे मुद्दे सांगत त्यांनी पालकांची मने जिंकली यानंतर विशेष पाहूण्या ऍडव्होकेट प्रफुल्लता जगताप यांनी पालकांना विशेष माहिती देण्याच्या हेतूने ग्राहक कायद्याविषयी सांगत त्याच्या अंतर्गत होणारी फसवणूक व त्यावर उपाय याविषयी माहिती दिली.

दुसऱ्या टप्प्यामध्ये विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या पालक सभेमध्ये प्रमुख पाहुण्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माधुरी पोफळे यांनी समाजाच्या आणि विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सुरक्षिततेसाठी पोलीस सदैव कार्य तत्पर असेल असे सांगत पोलिसांची विविध पथके जसे महिला साहि पक्ष, बडी कॉप, पोलीस काका पोलीस दीदी पथक, मनोधैर्य योजना, दामिनी पथक, ११३ पथक अशा विविध पथकांची माहिती सांगून त्यांची कार्यपद्धतीही सांगितली. या पथकांच्या माध्यमातून पोलीस सदैव समाजासाठी कार्यरत आहे असे आश्वासन दिले. यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक स्वाती लामखेडे यांनी सायबर क्राईम च्या अंतर्गत समाजाची विविध प्रकारे कशी फसवणूक होते याविषयी  माहिती देऊन समाजाने नेहमी जागृत राहिले पाहिजे पोलीस तुमच्यासाठी सदैव मदतशील राहील असे सांगितले. यानंतर त्यांच्यासोबत आलेल्या कॉन्स्टेबल आशा सनफ यांनी सोशल मीडिया वरून महिलांचे फोटो घेऊन त्याचा गैरवापर करून महिलांना फसविले जाते या संदर्भात माहिती दिली. यानंतर विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या उर्वशी खेलानी यांनी आपल्या फॅक्ट संस्थेअंतर्गत विद्यार्थ्यांना भारता बाहेरच्या शिक्षणासाठी कशाप्रकारे मदत होते याबाबत माहिती दिली. विद्यार्थी शिक्षणासाठी किंवा करिअरसाठी बाहेरच्या देशात जाण्यासाठी नेमकी कोण कोणती प्रोसेस करावी लागते याविषयी पालकांना सांगितले.

या पालक सभेमध्ये शेवटी पालकांशी खुला संवाद साधून विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. यावेळी पालकांनी महाविद्यालयाच्या कार्यपद्धतीचे व शिक्षकांचे कौतुक केले. या दोन्ही सभांचे प्रास्ताविक डॉ.वनिता कुऱ्हाडे यांनी केले. ही सभा पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. प्राध्यापिका विजया चौधरी यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या पालक सभेसाठी प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. वनिता कुऱ्हाडे तसेच कला वाणिज्य व विज्ञान शाखेच्या समन्वयिका आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. या सभेचे  सूत्रसंचालन प्रा. सुकन्या बॅनर्जी व प्रा. माधुरी चुगवानी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. वैशाली देशपांडे आणि डॉ.सुनिता पटनाईक यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button