Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

संभाजी भिडे यांच्या ‘त्या’ विधानावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले..

मुंबई : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी वादग्रस्त विधान केलं आहे. महात्मा गांधी यांचे वडील करमचंद नसून एक मुस्लीम जमीनदार आहेत, असं संभाजी भिडे म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संभाजी भिडे यांनी जे वक्तव्य केलं आहे, त्याचा मी पूर्णपणे निषेध करतो. महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये एक महानायक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अशा महानायकाबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं पूर्णपणे अनुचित आहे. माझं स्पष्ट मत आहे की, अशा प्रकारचं वक्तव्य भिडे गुरूजींसह इतर कुणीही करू नये. कारण अशा वक्तव्यांमुळे करोडो लोकांच्या मनात निश्चितपणे संताप निर्माण होतो. लोक महात्मा गांधीविरूद्ध बोललेलं कधीही सहन करणार नाही. या संदर्भात राज्य सरकारकडून उचित कारवाई केली जाईल.

हेही वाचा – ‘खैरे म्हणाले..आदित्य ठाकरेंनी सौंदर्य पाहून चतुर्वेदींना खासदार केलं’; संजय शिरसाट यांचा मोठा दावा

महात्मा गांधी असो वा स्वातंत्र्यवीर सावरकर असो, कुणाच्याही विरूद्ध बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही. संभाजी भिडेंचा भाजपाशी कीहीही संबंध नाही. ते स्वत:ची संघटना चालवतात. याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचं काहीही कारण नाही. संभाजी भिडेंनी महात्मा गांधीबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरतायत. पण राहुल गांधी जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अतिशय गलिच्छ बोलतात, त्याचाही त्यांनी निषेध केला पाहिजे. पण त्यावेळी ते मिंधे होतात. म्हणून कुठल्याही परिस्थितीत महात्मा गांधींचा अपमान सहन केला जाणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले? 

मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group