‘अजुन एखादा पक्ष फोडावा..’; राजू शेट्टी यांची नाव न घेता भाजपवर टीका
![Raju Shetty said that one more party should be split](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Raju-Shetty-780x470.jpg)
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे आक्रमक झाले आहेत. राजू शेट्टी यांनी सरकारला आठ दिवसांचा अल्टीमेट देत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच त्यांनी भाजपवर टीकास्त्र देखील सोडलं आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, सध्या राज्यात सत्तेसाठी फोडाफोडीचे राजकारण केलं जात असून अजून एखादा पक्ष फोडावा..अशी टीका भाजपवर केली आहे. तर सध्याच्या सुरू असणाऱ्या राज्यातील या राजकारणाच्या खेळखंडोब्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. तर अशा राजकारणामुळे आता मतदारांनीच या सर्वांना कात्रजचा घाट दाखवण्याची वेळ आली आहे, असा टोलाही लगावला.
हेही वाचा – महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचा धक्कादायक ओपिनियन पोल समोर; पाहा कोणाला किती जागा?
दरम्यान, राजू शेट्टी यांनी मणिपूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आणि येथील माता-भगिनींच्या अब्रूचे रक्षण करण्यासाठी आपण देशवासीय असमर्थ ठरलो याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी ७२ तास अन्नत्याग केला होता.