अविवाहितांसाठी खुशखबर! आता लग्न न झालेल्यांना मिळणार पेन्शन

मुंबई : सरकार नागरिकांसाठी नेहमीच नवीन योजना राबवत असते. अशातच आता अविवाहितांसाठी एक मोठी योजना राबवली आहे. आता हरियाणा सरकारने अविवाहितांसाठी पेन्शन स्कीमची घोषणा ( केली आहे. यामुळे अविवाहितांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार आहे.
हरियाणा सरकारच्या या अनोख्या योजने अंतर्गत ४५ ते ६० वयोगटातील अविवाहित महिला आणि पुरुषांना पेन्शन दिली जाणार आहे. यासंदर्भातील घोषणा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केली आहे. मात्र या योजनेचा फायदा घेण्यासाठी काही अटी लागू केल्या आहेत.
हेही वाचा – उद्धव ठाकरेंचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना इशारा; म्हणाले..
४५ ते ६० वयोगटातील ज्या पुरुषांचे आणि महिलांचे लग्न झालेलं नाही त्यांना हरियाणा सरकारकडून २,७५० रुपयांची मासिक पेन्शन मिळणार आहे. ज्या अविवाहित पुरुष आणि महिलेचे वार्षिक उत्पन्न हे १.८० लाखांच्या आत आहे त्यांना या पेन्शनचा लाभ मिळणार आहे. यासोबत ज्या विधुर पुरुषांचे वय ४० ते ६० आहे आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे ३ लाखांच्या आत आहे, त्यांनाही २,७५० रुपयांची मासिक पेन्शन देण्याचं सरकारने जाहीर केलं आहे.
हरियाणा राज्य सरकारने ही योजना लागू केल्यानंतर राज्यातील सुमारे १.२५ लाख लोकांना याचा लाभ मिळणार आहे. यावेळी हरियाणामध्ये वृद्धापकाळ, विधवा निवृत्ती वेतन आणि अपंग निवृत्ती वेतनाची सुविधा दिली जाते. राज्य सरकारने वृद्धापकाळ निवृत्ती वेतन ३००० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.




