महाराष्ट्र
शिराळा विधानसभा युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी प्रताप घाडगे, उपाध्यक्षपदी योगेश कुलकर्णी यांची निवड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/IMG-20180914-WA0000.jpg)
शिराळा – आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे नेते व जिल्हा परिषद सदस्य सत्यजित देशमुख यांनी संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. शिराळा विधानसभा युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी प्रताप घाडगे आणि उपाध्यक्षपदी योगेश कुलकर्णी यांची निवड केली असून, पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्धार केला आहे. शिराळा तालुका युवक कॉंग्रेसची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहन कदम, जिल्हा परिषद सदस्य आणि कॉंग्रेसचे नेते सत्यजित देशमुख, माजी सभापती हणमंत पाटील तसेच जयराज पाटील, जयकर कदम, के. डी. पाटील, युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप जाधव, भोजराज घोरपडे आदी उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे –
अध्यक्ष: प्रताप घाडगे (ऐतवडे बु.), उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी (आरळा), सरचिटणीस : सचिन पाटील (येडेनिपाणी), रणजित नलावडे (शिराळा), राहुल जाधव (चिंचोली), अक्षय सावंत (कामेरी), पृथ्वीराज पाटील (तांबवे), योगेश पाटील (कणदूर), अक्षय पाटील (तांदुळवाडी), अक्षय गंगधर (कांदे), युनुस मुजावर (आरळा), संपत काळे (प.त. वारु), सुवर्णा साळुंखे (बिळाशी).
योगेश कुलकर्णी यांना चौथ्यांना संधी…
युवा नेते योगेश कुलकर्णी यांना कॉंग्रेस संघटनेत काम करण्यासाठी चौथ्यांदा संधी मिळाली आहे. कॉंग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचा कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या योगेश कुलकर्णी यांनी विद्यार्थी कॉंग्रेसमधून पक्ष संघटनेत जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून आता चौथ्यांदा त्यांना महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगमी निवडणुकांच्या दृष्टीने कॉंग्रेसचे नेते सत्यजित देशमुख यांच्या पाठिशी तरुणांची मोठी फळी उभा करण्याचा निर्धार योगेश कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.