आदित्य ठाकरे यांना अटक होणार, भाजप नेत्याचा मोठा दावा

मुंबई : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना काही दिवसांत अटक होणार आहे. यामुळे उद्धव ठाकरे बिथरले आहेत, असा मोठा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
नितेश राणे म्हणाले की, आदित्य ठाकरेंच्या आदेशाशिवाय तो सकाळी शर्ट बदलत नाही. राहुल कनाल असो सूरज चव्हाण ही लहान माणसं आहेत. आदेश देणारे यांची नावे बाहेर आली पाहिजे. गुजराती माणसांचा पैसा चालतो. लंडनला दौरे काढायचे. सर्व स्वत:च्या पैशांनी काही करत नाही. लंडनला दौरा दुसऱ्यांच्या पैशांनी झाला आहे.
हेही वाचा – येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये पुन्हा एकदा हाणामारी, ४ कैद्यांविरोधात गुन्हा दाखल
काही दिवसांत आदित्य ठाकरेंना अटक होणार आहे. यामुळे उद्धव ठाकरे बिछरले आहेत. आदित्य ठाकरे जेलमध्ये जाऊ शकतात. ज्या आधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे, त्यांनी नावे द्यावी. ज्यांनी तुमच्यावर दबाव टाकला होता. व्हॉट्सअपची गोष्ट बाहेर आली तर मी खोक्यांची कॉल रेकॉर्डिंग बाहेर काढणार आहे. मग सांगावं की हा माझा आवाज नाही. कोणाला किती, वाहिनींना किती? अशी १३ मिनिटांची कॉल रोकॉर्डिंग आहे, असंही नितेश राणे म्हणाले.




