अंकित बावनेने ठोकले MPL मधील पहिले शतक, ‘एक शतक दोन रेकॉर्ड’

MPL 2023 : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महाराष्ट्र प्रिमियर लीग म्हणजेच MPL लीगचा सीजन सुरू आहे. एमपीएल लीगमधील काल पहिल्या शतकाची नोंद करण्यात आली आहे. कोल्हापूर टस्कर्सचा फलंदाज अंकित बावनेने पहिले शतक करण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.
अंकित बावने हा महाराष्ट्र प्रीमीयर लीगमध्ये कोल्हापूर टस्कर्सच्या संघाकडून खेळतो. काल १७ जून रोजी रत्नागिरी जेट्स बरोबर झालेल्या सामन्यात त्याने आपल्या फलंदाजीने चाहत्यांचे मन जिंकले. त्यांने ६० चेंडूत १०५ धावांची धुवाधार फलंदाजी केली. या शतकाने त्याने दोन नवीन रेकॉर्ड बनवले आहेत. हे त्याचे T-२० करियरमधील पहिलं शतक आहे. तसंच MPL मधील पहिले शतक आहे.
हेही वाचा – राजकीय भूकंप! ‘या’ शिलेदाराचा शिवसेना ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

रत्नागिरी जेट्सने पहिली फलंदाजी करत २० ओव्हरमध्ये ४ विकेट गमावत १७६ धावा केल्या होत्या. रत्नागिरीने प्रत्युत्तरात चांगली सुरूवात केली. कर्णधार केदार जाधवसह अंकित बावनेने धुवाधार फलंदाजी केली. केदार जाधवने ६ चेंडूत ६ धावा केल्या. अंकितच्या खेळीने कोल्हापूर संघाने २ चेंडू राखत आपला विजय नोंदवला. कोल्हापूरने ६ बाद १८१ धावा केल्या.





