‘PCMC नकोच जिजाऊनगरच हवे..’; पिंपरी-चिंचवड नामांतराचे पुन्हा लागले बॅनर्स
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचं नाव जिजाऊनगर करावं यासाठी काही दिवसांपुर्वी शहरात बॅनर्स लागले होते. भक्ती-शक्ती प्रतिष्ठानने हे बॅनर्स लावले होते. दरम्यान, पुन्हा एकदा शहरात नामांतराचे बॅनर्स लागले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
आज राजमाता जिजाऊ यांची ३५० वी पुण्यतिथी आहे. राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शहरभर पीसीएमसी नको जिजाऊनगरच अशा आशयाचे बॅनर्स लागले आहेत.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वैश्याव्यवसाय; दोन मुलींची सुटका
काही दिवसांपूर्वीच भक्ती-शक्ती प्रतिष्ठानने पिंपरी-चिंचवड शहरात जिजाऊनगर करण्याची मागणी केली होती. दरम्यान, पुन्हा एकदा भक्ती-शक्ती प्रतिष्ठानने शहरात फ्लेक्स लावले आहेत. पिंपरी-चिंचवडची ओळख ही अनेकदा पीसीएमसी म्हणून करण्यात येत आहे. भविष्यात हेच नाव पडू शकतं हे लक्षात घेऊन शहराला जिजाऊनगर नाव द्यावं अशी मागणी भक्ती-शक्ती प्रतिष्ठान चे महेश बारणे यांनी केली आहे.