MPL च्या पहिल्या सामन्यात पुणे बाप्पाचा कोल्हापूर टस्कर्सवर दमदार विजय
![Pune Bappa's strong win over Kolhapur Tuskers in the first match of MPL](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/MPL-2023-1-780x470.jpg)
MPL २०२३ : महाराष्ट्र प्रीमियर लीगला काल १५ जून रोजी सुरूवात झाली आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हे सामने खेळवले जात आहेत. पुणेरी बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स या संघात पहिला सामना काल खेळला गेला. या सामन्यात पुणेरी बाप्पा संघाने ८ गडी राखून कोल्हापूर टस्कर्स संघाचा पराभव केला आहे.
केदार जाधवच्या कोल्हापूर टस्कर्स संघाने प्रथम फलंदाजी करत पुणेरी बाप्पा संघासमोर विजयासाठी १४५ धावांचे आव्हान ठेवले होते. महाराष्ट्र रणजीपटू अंकित बावणेने ५७ चेंडूत ७२ धावांची दमदार खेळी केली. तसेच कर्णधार केदार जाधव यानेही संघासाठी चांगली फलंदाजी केली.
हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पिंपरी-चिंचवड शहर दौऱ्यावर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/image-55.png)
प्रत्युत्तरात ऋतुराज गायकवाडच्या पुणेरी बाप्पा संघाने २ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. पुणेरी संघाचा कर्णधार ऋतुराज गावकवाड आणि पवन शाह या दोघांनी सर्वाधिक अर्धशतकी खेळी केली. ऋतुराजने २७ चेंडूत ६४ धावांची दमदार खेळी केली. तर पवन शाहने ४८ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. या दोघांच्या दमदार खेळीने पुणेरी बाप्पाचा विजय सोपा झाला.
दरम्यान, आज दोन सामने खेळले जाणार आहेत. ईगल नाशिक टायटन्स विरूद्ध छत्रपती संभाजी किंग्स यांच्यात सामना खेळला जाणार आहे. हा सामना दुपारी २ वाजता खेळला जाणार आहे. तर रात्री ८ वाजता रत्नागिरी इगल्स विरूद्ध सोलापूर रॉयल्स यांच्यात सामना खेळला जाणार आहे.