Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणे

बोपोडीत फुलपाखरू उद्यानाच्या उद्घाटनाला फुलपाखरांची हजेरी

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशालेमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम : विद्यार्थी- शिक्षकांचा उत्साहात सहभाग

बोपोडी : पुणे महानगरपालिकेच्या बोपोडी येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशालेमध्ये फुलपाखरू उद्यानाचे उत्साहात उद्घाटन झाले. या समारंभा नंतर त्या परिसरात खरोखर फुलपाखरांनी उपस्थिती लावून शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचे जणू मनःपूर्वक आभारच मानले.
पुण्यातील पर्यावरण शिक्षण केंद्राच्या पुढाकारातून आणि इ. पी. ए. एम. कंपनीच्या आर्थिक मदतीतून हे फुलपाखरू उद्यान साकारले आहे.

या व्यतिरिक्त ‘ लेंड- ए – हँड ( इंडिया) या संस्थेने ही मोलाचे सहकार्य केले आहे. यावेळी शाळेचा एक तास फुलपाखरू उद्यानासाठी देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. यावेळी पर्यावरण प्रेमी, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी वृक्षारोपण करून मोठी जबाबदारी पार पडली. शालाप्रमुख सौ. आसावरी गुमास्ते यांनी पुढाकार घेऊन आणि मार्गदर्शन करून या सोहळ्याचे आयोजन तसेच प्रास्ताविक केले. गार्डी मॅडम यांनी सूत्रसंचालन केले.
इ. पी. ए. एम. चे सीनियर डायरेक्टर, अकाउंट मॅनेजर महेश पाटील सर यांनी कंपनी बद्दल माहिती दिली. प्रवीण थेटे सर आणि बसवंत धुमणे सर हे वनस्पती आणि फुलपाखरे यांची माहिती देत असताना सर्व उपस्थित तल्लीन होऊन ती ऐकत होते. यावेळी बहावा, आंबा, लिंबू कडीपत्ता, पानफुटी, हळदीकुंकू गणेर अशा प्रकारची फुलपाखरांना आकर्षित करणारी झाडे लावण्यात आली.

हा वृक्षारोपणाचा आनंद सोहळा सुरू असताना या फुलपाखरू उद्यानामध्ये अनेक प्रकारची फुलपाखरे भिरभिरत आणि विशिष्ट आवाज करत इकडून तिकडे उडताना दिसल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button