TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र
इयत्ता दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
![10th class, successful in exam, meritorious, felicitation of students,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/10th-Student-Feliciate-780x470.png)
पिंपरी-चिंचवडः
शिवभक्त अजित शिंदे मित्र परिवाराच्यावतीने ओवळे गावातील इयत्ता दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये ओवळे गावातील कु.रोशन हिरामण भालेराव या विद्यार्थ्याने 77% गुण मिळवून ओवळे गावात मुलांच्या गटामध्ये प्रथम क्रमांक आणि श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयात द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल तसेच कु. नम्रता जालींधर भालेराव या विद्यार्थीने 70.80 गुण मिळवून ओवळे गावात मुलींच्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ओवळे गावचे सामाजिक कार्यकर्ते श्रीसंभाजीभाऊ भालेराव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.