‘नसबंदी झाल्यावर मुलं होत नाहीत पण संजय राऊत..’; शिंदे गटातील नेत्याची खोचक टीका
![Sanjay Shirsat said that Sanjay Raut is Prem Chopra in politics](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Sanjay-Raut-1-780x470.jpg)
मुंबई : शिंदे गट म्हणजे भाजपाने पाळलेला कोंबड्याचा खुराडा आहे, असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वक्तव्य केलं होतं. राऊतांच्या त्या वक्तव्यावरून शिंदे गटातील नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, संजय राऊत हा राजकारणातला प्रेम चोपडा आहे. त्याला रोज काही ना काही बडबड करून कुणालाही नांदू द्यायचं नाही असा त्यांचा चंग असतो. खरंतर त्याने आज जे स्टेटमेंट केलंय आम्हाला कोंबड्यांचा खुराडा वगैरे जे म्हणाला आहे, त्याने रमजानमध्ये शीरखुर्मा जास्त खाल्ल्याने त्याच्यावर कापायचा प्रभाव पडला आहे. ज्याची नसबंदी झाल्यावरही आम्हाला मुलं होतील असं सांगतो आहे. १८ खासदारांपैकी १३ खासदार निघून गेले आहेत. पाच खासदार राहिले तरीही दावा १९ खासदार निवडून येतील हा दावा करणं हा मूर्खपणा संजय राऊत करतो आहे. त्यामुळे हा पक्षही लयास गेला आहे.
हेही वाचा – खुशखबर! आता FASTag अकाउंटवर जमा केलेल्या पैशांवर मिळणार व्याज?
संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
तुम्ही जो काय शिंदे-मिंधे गट म्हणत आहात त्यांच्याकडे मी पक्ष म्हणून पाहातच नाही. भाजपाने पाळलेल्या कोंबड्यांचा तो खुराडा आहे. गावाला कोंबड्यांचे खुराडे असतात, कधीही कुठल्याही कोंबड्या कापल्या जातील. हे लक्षात घ्या. तो पक्ष नाहीच, कोंबड्या कॉक कॉक आरवत असतात. तसं ते बोलतात, पक्ष म्हणून त्यांच्याकडे काय बैठक आहे? काय विचारधारा आहे? निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह विकत दिलं म्हणजे तो पक्ष ठरत नाही. त्या टोळीने ४८ जागा लढवाव्यात आम्हाला काही फरक पडत नाही. मागच्या लोकसभेत आमचे १९ खासदार होते. यावेळी ती संख्या कायम राहिल. कोण शिंदे मिंधे आहेत त्यांचे पाच खासदार आले तरी मोठी गोष्ट मानेन, असं संजय राऊत म्हणाले.