‘आपण लवकरच सत्तेत असू’; अमित ठाकरेंचं सूचक विधान
![Amit Thackeray said that we will be in power soon](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/amit-thackeray-780x470.jpg)
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा मेळावा आज मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी अमित ठाकरे यांनी लवकरच आपण सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
अमित ठाकरे म्हणाले की, आपण इथे फक्त कामगार सेनेची ताकद बघायला आलोय. तुम्ही उगाच माझं नाव घेतात. हे सगळं तुमचे कष्ट आहेत. तुम्ही म्हणतात ५० टक्के कामं होतात, काही कामं होत नाहीत. आपण लवकरच सत्तेत असू, आपली १०० टक्के कामं पूर्ण होतील, असं म्हणाले.
अमित राजकारणात आल्यापासून मी आळशी झाली आहे. मी आज इथे येणार नव्हते पण फक्त तुमच्यासाठी मी इथे आलेय. कामगार कपात सगळीकडे सुरू आहे. त्यात आपण कामगारांना न्याय देत आहात. तुमच्या कामाचा कौतुक करण्यासाठी मी इथे आले आहे. पुढच्या वर्षी मी येणार नाही कारण पुढच्या वर्षी माईक हा अमितच्या हातात गेला पाहिजे. बाकीच्यांची टीम ६० प्लस आहे. आपली टीम तरूण आहे. कठीण काळात तुम्ही कामगारांना न्याय मिळवून देत आहात. सगळ्यांनी चांगलं काम केलंय म्हणून एवढे युनिट वाढले आहेत, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.