‘गौतमी पाटील बैलासमोर नाचेल नाहीतर..’; अजित पवारांची फटकेबाजी

पुणे : नृत्यांगणा गौतमी पाटील हीच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात गौतमीने चक्का बैला समोर नाचतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, यावरून आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मिश्कील टिप्पणी केली आहे.
अजित पवार म्हणाले की, अनेक गावांत यात्रा, सुरू आहेत. तेव्हा काही ठिकाणी करमणुकीसाठी तमाशे बोलवले जातात. त्यामुळे सध्या गौतमीचं नाव गाजत असून, पाटीलबाईंना आणा, याबद्दल मी सुचवलं होतं. जर त्यांना सुपारी परवडत, असेल तर नक्की बोलवावे.
बैल काय गायीसमोर नाचू देत, तिचा तो अधिकार आहे. हाच गौतमीचा व्यवसाय आणि उपजिविकेच साधन देखील आहे. कला आणि अभिनयाच्या माध्यमातून ती त्याच्याकडं पाहते. लहान मुलाचं बारसं आहे, त्याला अजून काहीच कळत नाही. तरी देखील बारशाच्या निमित्ताने बोलावलं, तर तिला नाचावच लागतं. बैलाचा वाढदिवस असो किंवा बैलपोळाच्या शर्यतीत बैलगाडा पहिला आला असेल, तिचे ते कामच आहे, असंही अजित पवार म्हणाले.




