Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

‘संबंधित अधिकाऱ्यांनी ४८ तासांच्या आत माफी मागावी’; आप खासदाराचा ईडीला इशारा

दिल्ली : आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी ईडीलाच मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्यांनी ही नोटीस ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा आणि कथित घोटाळ्याच्या प्रकरणाची चौकशी करणारे तपास अधिकारी जोगेंदर यांना पाठली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी ४८ तासांच्या आत माफी मागावी, अशी मागणी संजय सिंह यांनी केली आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईसाठी तयार राहा, असा इशाराही सिंह यांनी दिला आहे.

संजय सिंह म्हणाले की, ईडीने जाणून बुजुन चार्जशीटमध्ये माझं नाव टाकलं आहे. कोणत्याही साक्षीदाराने माझं नाव घेतलेलं नाही. तरीदेखील या खटल्यात माझं नाव गोवून सक्तवसुली संचालनालयाने मला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलं आहे. मुळात माझ्याविरोधात त्यांच्याकडे एकही साक्षीदार नाही.

दिल्लीतल्या कथित मद्य घोटाळा प्रकरणाच्या आरोपपत्रात चुकीच्या पद्धतीने माझं नाव टाकल्याबद्दल मी ईडीच्या अधिकाऱ्यांविरूद्ध मानहानीचा फौजदारी खटला दाखल करेन, असा इशारा खासदार संजय सिंह यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button