breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय
‘महाराष्ट्रात लवकरचं राजकीय भूकंप होणार’; राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांचा दावा
![Prakash Solanke said that there will be a political earthquake in Maharashtra soon](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/ajit-pawar-and-devendra-fadnavis-1-780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासुन सुरू आहेत. अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादी सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रात लवकरचं राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा, राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी केला आहे.
प्रकाश सोळंकी म्हणाले की, महाराष्ट्रात लवकरचं राजकीय भूकंप होणार आहे. सध्या महाराष्ट्रात जी चर्चा सुरुय ते नक्की होणारचं आहे. माझ्या ३५ वर्षाच्या राजकारणाचा अनुभवावरून मी हे सांगत आहे. आगामी निवडणुकीच्या अगोदर भाजप महाराष्ट्रात काही ना काही चमत्कार करेल.
प्रकाश सोळंके यांच्या या दाव्यानंतर आता अजित पवार भाजपासोबत जाणार अल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.