‘शरद पवार यांनी अदानींची भेट घेतली नाही..’; अजित पवार म्हणाले
![Ajit Pawar said that Sharad Pawar did not meet Gautam Adani](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Ajit-Pawar-2-2-780x470.jpg)
पुणे : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली, यावर सध्या उलट-उलट चर्चा सुरू आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, शरद पवार यांनी गौतम अदानींची भेट घेतली नाही, तर अदानींनी त्यांची भेट घेतली आहे. त्यांचे जुने मैत्रीचेसंबध आहे, हे सगळ्यांना माहित आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
मी निवडणूक अधिकारी नाही. जेव्हा निवडणूक अधिकारी होईन तेव्हा मी नक्की सांगेन की निवडणुका कधी होतील. फेब्रुवारी २०२२ मध्ये निवडणुका होणार होत्या. त्यावेळी अनेक इच्छूकंनी तयारी केली. देव दर्शन केले. निवडणुका काही झाल्या नाहीत. आता सर्व इच्छूक कंटाळले आहेत. प्रशांत जगताप यांचे भावी खासाद असे बॅनर लागले आहेत. प्रशांतला माझ्या शुभेच्छा.., असंही अजित पवार म्हणाले.