Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

शाहरूख खान, विराट कोहलीसह अनेक सेलिब्रिटींच्या खात्यावरून ट्विटर ब्लू टिक गायब!

Twitter : एलॉन मस्कने ट्वीटर विकत घेतल्यापासून ट्वीटरमध्ये अनेक बदल केले आहेत. काही दिवसांपुर्वी ट्वीटरचा लोगो बदलला होता. आता पुन्हा एकदा ट्वीटरने एका निर्णयाची अंबलबजावणी करायला सुरूवात केली आहे. याचा फटका जगभरातील अनेक दिग्गज नेते, अभिनेते, खेळाडूंना बसला आहे.

काही दिवसांपुर्वी एलॉन मस्क यांनी ट्वीटरवरील ब्लू टिकसाठी पैसे मोजण्याचा निर्णय जाही केला. त्यापाठोपाठ ज्यांना याआधी फुकटात ब्लू टीक मिळाली आहे. त्यांचीही ब्लू टिक काढण्याचा निर्णय घेतला. आता त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. याचा फटका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसतभा विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधी, प्रियांका गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे.

याशिवाय कलाजगत आणि क्रीडा जगतातील सेलिब्रिटी मंडळींच्याही अकाउंट्सच्या ब्लू टिक काढण्यात आल्या आहेत. यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांचा समावेश आहे. तर बॅलिवूड मधील शाहरूख खान, अमिताभ बच्चन, आलिया भट यांच्या अकाऊंट्सच्या ब्लू टिक काढण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button