महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रज्ञासूर्य लोकनायक!
आमदार महेश लांडगे यांच्या भावना : जयंतीदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
![IPL, on cricket match, betting, 5 bookies who placed, arrested in Chinchwad,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Ambedkar-Jayanti-Pimpri-780x470.png)
पिंपरी : समाजातील दिन-दुबळ्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार यशस्वी करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रज्ञासूर्य लोकनायक आहेत. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा… असा संदेश देणारे डॉ. आंबेडकर युगानुयुगे वंदनीय राहतील, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.
पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोरवाडी येथील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. यावेळी विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, प्रदेश सचिव अमित गोरखे, दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष सुभाष सरोदे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार लांडगे म्हणाले की, भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले होते. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणा आणि अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला प्राधान्य दिले.