साईबाबांविषयीच्या विधानावर धीरेंद्र शास्त्रींचं स्पष्टीकरण; म्हणाले,..
![Dhirendra Shastri's explanation of the statement about Sai Baba](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Bageshwar-Dham-780x470.jpg)
Bageshwar Dham : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी गेल्या काही दिवसांपुर्वी शिर्डीचे साईबाबा यांच्या विषयी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून वाद सुरू झाल्यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी त्याबाबतही माफीनामा जारी केला आहे.
धीरेंद्र शास्त्री यांनी वादंग निर्माण झाल्यानंतर बागेश्वर धामच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून माफीनामा जाहीर केला आहे. मी नेहमीच संत आणि महापुरूषांचा सन्मान ठेवला आहे आणि कायम ठेवेन. मी एक म्हण सांगितली होती. त्याचा साधारण अर्थ होता की जर आपण मागे छत्री लावून म्हणालो की आम्ही शंकराचार्य आहोत, तर हे कसं होऊ शकेल. आपल्या शंकराचार्यांनी जे सांगितलं, तेच मी पुन्हा सांगितलं, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
आपल्या शंकराचार्यांनी म्हटलंय की साईबाबा संत-फकीर असू शकतात. त्यांच्यावर लोकांची वैयक्तिक श्रद्धा आहे. जर कुणी व्यक्ती वैयक्तिक आस्थेपोटी एखाद्या संत-गुरूंना ईश्वर मानत असेल, तर ती त्याची वैयक्तिक आस्था आहे. आमचा त्याला कोणतीही विरोध नाही. माझ्या कुठल्या शब्दामुळे कुणाचं मन दुखावलं गेलं असेल, तर आम्हाला त्याचं मनापासून दु:ख आणि खेद आहे, असंही धीरेंद्र शास्त्री यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.