Breaking-newsपुणेमहाराष्ट्र
बंडगार्डन परिसरातील सराईत एका वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/crime-13.jpg)
बंडगार्डन आणि कोरेगाव पार्क येथे दहशत पसरविणा-या सराईत गुन्हेगाराला आज सोमवार (दि.10) पासून पुढील एका वर्षकरिता पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
संतोष सुरेश कांबळे (वय 23, रा.ताडीवाला रोड, पुणे), असे तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोषवर मारहाण करून गंभीर जखमी करणे, बेकायदेशीर शस्त्रे बाळगून दंगा करणे यांसारखे गंभीर गुन्हे बंडगार्डन व कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दाखल होते. त्यामुळे त्याची त्या भागामध्ये दहशत असल्याने त्याला युनिट दोनचे पोलीस उपआयुक्त बच्चन सिंह यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार केले आहे.