पिंपरी-चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात ‘ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : प्रसिद्ध लेखक अजित कुमार झा यांनी लिहिलेल्या ‘ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन दिल्लीतीय इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये नुकतेच करण्यात आले.
ईशान्य क्षेत्र विकास आणि संस्कृती, पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी प्रमुख म्हणून उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड विद्यापीठाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.
ईशान्य प्रदेशाच्या विकासाचा इतिहास नोंदवण्यासाठी हे पुस्तक लिहिले गेले आहे. केंद्र सरकारने ईशान्य भारताच्या उन्नतीसाठी दृढनिश्चय आणि संकल्प केला आहे. गेला सात वर्षांत ईशान्य भारतात विकासासाठी ऐतिहासिक कार्य केले आहे. ज्याचे सिंहावलोकन या पुस्तकात केले आहे. अजित कुमार झा हे एक अनुभवी सरकारी अधिकारी आहेत आणि त्यांचे हिंदीतील पुस्तक, ‘सशक्त पूर्वोत्तर, दक्षिण पूर्व एशिया का द्वार’ खूप गाजले होते.