breaking-newsराष्ट्रिय

इंधनाचे दर वाढले तर खर्च कमी करा, भाजपा मंत्र्याचा जनतेला सल्ला

वाढत्या इंधन दरामुळे विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसरीकडे इंधनाचे दर नियंत्रणात ठेवणे आपल्या हातात नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. आता राजस्थानमधील एका मंत्र्याने तर सर्वसामान्यांना खर्च कमी करण्याचा सल्ला दिला आहे. राजस्थानचे मंत्री राजकुमार रिन्वा यांनी इंधनाचे दर वाढले तर जनतेने खर्च कमी करावा असे म्हटले आहे. आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे त्रस्त असलेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार रिन्वा यांच्या या वक्तव्यामुळे झाला आहे.

ANI

@ANI

World market mein jo crude ka price hota hai us hisaab se chalta hai, Sarkar koshish kar rahi hai. Itna kharche hain, flood hain chaaro taraf,itna consumption hai.Janta samajhti nahi hai,ki crude ka daam badh gaya to kuch kharche kam kar de: Rajasthan Minister Rajkumar Rinwa

जागतिक बाजारात जे कच्च्या तेलाचे दर असतात. त्या हिशोबानेच पेट्रोल, डिझेलचे दर निश्चित होतात. सरकार प्रयत्न करत आहे, असे सांगत इतके खर्च आहेत, चहुबाजुंनी पूर आला आहे. उत्पादन नाही. जनतेला समजत नाही की, कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत, काही खर्च त्यांनी कमी करावा, असे रिन्वा यांनी म्हटले.

दरम्यान, सोमवारीही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली. परभणीमध्ये पेट्रोलच्या दराने ९० ची पातळी गाठली आहे. सध्या तिथे ८९.९७ रूपये लिटर दराने पेट्रोल विकले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button