४८ जागा लढवायला आम्ही काय मुर्ख आहोत का? शिंदे गटातील आमदाराचा बावनकुळेंवर पलटवार
चंद्रशेखर बावनकुळेंना एवढा कोणी अधिकार दिलेला नाही

मुंबई : आगमी विधानसभा निवडणुकांमध्ये शिंदे गटाला ४८ जागा देणार असल्याचं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल एका सभेत केलं. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पलटवार केला आहे. ४८ जागा लढवायला आम्ही काय मुर्ख आहोत का? असं संजय शिरसाट म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतिउत्साहात ते वक्तव्य केलं आहे. बावनकुळेंनी केलेल्या स्टेटमेंटमध्ये काही दम नाही.
बावनकुळेंना एवढा कोणी अधिकार दिलेला नाही. अशी स्टेटमेंट दिल्यानं युतीमध्ये बेबनाव येतो. याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. ४८ जागा लढवायला आम्ही काय मुर्ख आहोत का? याची वरिष्ठ पातळीवर बैठक होईल. त्या बैठकीत वरिष्ठ जो निर्णय घेतील तो त्यांना जाहीक करू द्या. तुम्हाला अधिकार कोणी दिला. अशामुळे पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होते, असं संजय शिरसाट म्हणाले.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढविण्याचा विचार करीत असल्याचे वक्तव्य मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करताना आणि सज्ज रहावे, यासाठी केले होते. निवडणुकीच्या वेळी जागावाटपाचा विचार होईल. शिंदे गटाबरोबर असलेल्या आमदारांच्या जागांपेक्षा ज्या आणखी जागा शिंदे गटाकडे जातील, त्यांना भाजपने केलेल्या निवडणूक तयारीचा उपयोगच होईल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.





