रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट लागू
![Arrest warrant against Russian President Vladimir Putin](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Vladimir-Putin-780x470.jpg)
Vladimir Putin : गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. अशातच आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्टाने रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना मोठा झटका दिला आहे. या युद्धादरम्यान इंटरनॅशनल क्रिमीनल कोर्टाने युक्रेनमधील युद्ध गुन्ह्यांसाठी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने (ICC) युक्रेनच्या युद्ध अपराधांसंबंधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट लागू केला आहे. युक्रेनमध्ये होणाऱ्या युद्ध आणि इतर अपराधांसाठी व्लादिमिर पुतीन यांना जबाबदार धरलं आहे.
मॉस्कोने या संदर्भातल्या आरोपांचं वारंवार खंडन केलं आहे. रशियाच्या सैन्य दलांनी युक्रेनवर हल्ला करताना कुठलाही अत्याचार केलेला नाही. मात्र आयसीसीने आज पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातली बातमी दिली आहे.