भाजपा आमदार महेश लांडगे यांना लग्नाच्या वाढदिनी मुलीकडून खास ‘सरप्राईझ’… काय ते वाचा?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Mahesh-Landge-Pimpri-Chinchwad-1-780x470.jpg)
पिंपरी : विशेष प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांचे ‘प्रमोशन’ झाले आहे. अत्यंत भव्य-दिव्य ‘इव्हेंट’ साजरे करणारे आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला नेता म्हणून लांडगे यांची ओळख आहे. कधी प्रखर हिदुत्ववादी भूमिका… तर कधी बैलगाडा शयर्तीसाठी लढणारे आमदार लांडगे आपल्या हटके स्टाईलमुळे महाराष्ट्राच्या घराघरात परिचित आहेत.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने लांडगे पुन्हा एकदा चर्चेत आले होते. त्यानंतर शास्तीकर आणि अन्य विकासकामांसाठी त्यांच्या नावाची चर्चा संपूर्ण पुणे जिल्ह्यात झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गुड बॉक्स’मध्ये स्थान मिळवण्यात त्यांना यश मिळाले आहे. पुणे जिल्ह्यातील भाजपाचा प्रभावी चेहरा असलेल्या लांडगे यांच्यावर राष्ट्रवादीला रोखण्यासाठी विविध जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळ विस्तारात त्यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.
अशातच आमदार लांडगे यांचे ‘प्रमोशन’ म्हटल्यावर अनेकांच्या भूवाया उंचावल्या असतील. मात्र, लांडगे यांचे प्रमोशन हे कौटुंबिक आहे. महेश लांडगे यांच्या कन्या साक्षी भोंडवे-लांडगे यांना कन्यारत्न झाले आहेत. त्यामुळे ‘‘मी आजोबा झालो… साक्षीला मुलगी झा…’’अशी पोस्ट फेसबूकवर टाकली आहे. नव्या पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी भोंडवे आणि लांडगे कुटुंबीय उत्सूक आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील प्रसिद्ध उद्योगपती एन. बी. भोंडवे यांचा मुलगा निनाद भोंडवे आणि आमदार महेश लांडगे यांची मुलगी साक्षी लांडगे यांना कन्यारत्न झाले आहे. त्यामुळे भोंडवे व लांडगे परिवारामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे, आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या सौभाग्यवती पूजा लांडगे यांचा आज लग्न वाढदिवस आहे. याच दिवशी नातीचे सोनपावलांनी आगमन झाल्यामुळे लांडगे परिवारामध्ये उत्सव साजरा होत आहे. त्यामुळे लग्नाच्या वाढदिनी मुलगी साक्षी हिच्याकडून आमदार लांडगे यांना खास ‘सरप्राईझ’ मिळाले आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/image-2.png)