कसब्यात ५०.०६ तर चिंचवडमध्ये झाले ५०.४७ टक्के मतदान
पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी आज मतदान प्रक्रिया पुर्ण झाली. आज सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. तसेच मतदानाची एकूण टक्केवारी किती होते, हे पाहणं महत्वाचे आहे.
कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. चिंचवडच्या मतदारसंघात एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार आहेत. पोटनिवडणुकीसाठी ५१० मतदार केंद्रावर मतदान पार पडले. सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५०. ४७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
तर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील १३५ मतदान केंद्रावर मतदान पार पडले. सकाळी ७ वाजल्यापसून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५०. ०६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
दरम्यान, २०१९ विधानसभेला चिंचवड मतदारसंघात ५६.३० टक्के मतदान झाले होते. तर कसबा मतदारसंघात ६१.५७ टक्के मतदान झाले होते.