मोशीतील मानाच्या विड्यासाठी तब्बल ८१ लाखांची बोली
![A whopping 81 lakhs was bid for Mana Vidya in Moshi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Nageshwar-Maharaj-Moshi-780x470.jpg)
मानाच्या ओटीची ३३ लाख ५५ हजार ५५५ रूपयांना बोली
पुणे : मोशीतील ग्रामदौवत श्री नागेश्वर महाराज भंडारा उत्सव राज्यात प्रसिद्ध आहे. या उत्सवातील यंदाच्या लिलावामध्ये मानाच्या विड्याला तब्बल ८१ लाखांची बोली लावली गेली. हा विडा मोशीतील उद्योजक अतिश बारणे व अक्षय बारणे यांनी घेतला. या विड्यातून महाराजाचा आशीर्वाद मिळाल्याची भावना अतिश बारणे आणि अक्षय बारेण यांनी व्यक्त केली.
यासोबतच, मानाची ओटी भालचंद्र बोराटे यांनी ३३ लाख ५५ हजार ५५५ रूपये, मानाचे पहिले लिंबू (फळ) १३ लाख २५ हजार रूपयांना उद्योजक अतिश बारणे, अक्षय बारणे, दुसरे लिंबू राजू बोराटे यांनी ७ लाख ५१ हजारांना तर शेवटचे मानाचे लिंबू १७ लाख रूपयांना निरज सस्ते यांनी बोली लावली.
दरवर्षी या लिलावामध्ये भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूं व भंडाऱ्यातील प्रसाद बनवण्याची भाडी व इतर वस्तूंची बोली लावली जाते. ग्रामस्थांकडून भंडाऱ्यातील महाप्रसाद बनविण्याची भाडी दरवर्षी नव्याने खरेदी केली जातात. लिलावाच्या वेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/image-37-1024x668.png)