‘अर्ज मागे घे अन् पुणे सोडून जा’; अभिजीत बिचुकलेंना धमकी
![Abhijeet Bichukale threatened to withdraw application for Kasba by-election](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/abhijit-bichukale-780x470.jpg)
कसबा पोटनिडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी अभिजीत बिचुकलेंना धमकी
पुणे : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेंनी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. बीचुकले यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर बीचुकले यांच्याकडून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
कसबा मतदारसंघ पोटनिडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी बिचुकले यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अर्ज मागे घे आणि पुणे सोडून जा आशा धमक्या येत असल्याचा बिचुकले यानी म्हटलं आहे. यानंतर अभिजीत बीचुकले यांनी तेट निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहलं आहे.
दरम्यान, अभिजीत बिचुकलेंनी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपली पत्नी अलंकृता यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. पत्रकारांनी त्यांना तुम्ही कसबा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. तुम्हाला कसब्यातील समस्या माहिती आहेत का? असा प्रश्न विचारला असता ते चांगलेच भडकले. तुमचा काय अभ्यास आहे विचारत निघून गेले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/image-6-edited.png)