श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा राडा
श्री श्री रविशंकर यांचा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना प्रेमाचा सल्ला
तुळजापूर : आर्ट ऑफ लिव्हींगचे संस्थापक धर्मगुरू श्री श्री रविशंकर यांच्या जागर भक्तीचा या कार्यक्रमाचे आज तुळजापुर येथे आयोजन केले होते. या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला आहे. त्यांनी कडक पोलीस बंदोबस्तानंतरही काही कार्यकर्त्यांनी श्री श्री रविशंकर यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली.
श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्या जुन्या विधानावरून संभाजी ब्रिगेडने आंदोलनाचा इशारा दिला होता. यामुळे कार्यक्रमाला कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही काही कार्यकर्त्यांनी श्री श्री रविशंकर यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री श्री रविशंकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्याकर्त्यांच्या कामाची स्तुती करत इतिहासकारांच्या वेगवेगळ्या लिखाणाने काही चुका झाल्या. त्याकडे दुर्लक्ष करून मिळून काम करू असा प्रेमाचा सल्ला दिला.