Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

बाबा रामदेव यांचे पुन्हा वादग्रस्त विधान; म्हणाले,..हिंदू मुलींना उचलून न्या

नमाज पठण करा आणि तुम्हाला जे काही पाप करायचे आहे ते करा

मुंबई : यागगुरू बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. बाबा रामदेव यांनी राजस्थानच्या बाडमेर येथील एका धार्मिक सभेत इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मुस्लिम दहशतवादी असला तरी तो नमाज नक्कीच अदा करतो. अशा लोकांना इस्लामचा अर्थ फक्त नमाजपर्यंत समजतो. पाच वेळा नमाज पठण करा आणि तुम्हाला जे काही पाप करायचे आहे ते करा. हिंदू मुलींना उचलून न्या किंवा जिहादच्या नावाखाली दहशतवादी बनून तुमच्या मनात येईल ते करा. पण, हिंदू धर्मात असे नाही, असं बाबा रामदेव म्हणाले.

ख्रिश्चन धर्माबाबतही बाबा रामदेव यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. चर्चमध्ये जा आणि मेणबत्ती लावा आणि येशू ख्रिस्तासमोर उभे राहा. सर्व पापे धुतली जातात. पण, हिंदू धर्मात असे केले जात नाही. मी कोणावरही टीका करत नाही, पण हे लोक असेच आहेत. काही जण संपूर्ण जगाला इस्लाममध्ये धर्मातरित करत आहेत, तर काहींना ते ख्रिश्चनमध्ये धर्मातर करत आहेत, असं बाबा रामदेव म्हणाले.

दरम्यान, याआधी बाबा रामदेव यांनी आम्ही जर हत्यारं उचलली असती, तर आज इथे एक सुद्धा मुस्लिम आणि ख्रिश्चन राहिला नसता, असं वादग्रस्त विधान बाबा रामदेव यांनी केलं होतं.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button