दिल्लीत 10 दिवसातील सर्वात मोठी इंधनदरवाढ
- पेट्रोलच्या किंमतीत 48 पैशांनी तर डिझेलमध्ये 52 पैशांनी वाढ
नवी दिल्ली – दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी दरवाढ झालेली आहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 48 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 52 पैशांनी महागले आहे. मागील 10 दिवसातील ही सर्वात मोठी दरवाढ आहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 79.99 रूपये तर डिझेलचे दर प्रति लिटर 72.07 रूपये असे आहेत. दिल्लीमध्ये पहिल्यांदाच डिझेलच्या किंमतीने सत्तरी पार केली आहे.
डॉलरच्या किंमती वाढून रूपयाच्या किंमती रोज घसरत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्चा तेलाची आयात करणे दिवसेंदिवस महाग ठरत आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा स्थितीत केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात करून नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी जनतेकडून होत आहे पण सरकारने त्यास पुन्हा नकार दिला आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमती विरोधात काँग्रेसने 10 सप्टेंबर रोजी भारत बंद चा निर्णय घेतला आहे.
दिल्लीप्रमाणे इतर प्रमुख शहरात देखील इंधन दरवाढ सुरूच आहे. इतर प्रमुख शहरातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुढीलप्रमाणे :
मुंबई – पेट्रोल (87.39 रूपये), डिझेल (76.51 रूपये)
चेन्नई – पेट्रोल (83.13 रूपये), डिझेल (76.17 रूपये)
कोलकत्ता – पेट्रोल (82.88 रूपये), डिझेल (74.92 रूपये)
पुणे – पेट्रोल (87.25 रूपये), डिझेल (75.20 रूपये)