सामाजिक सद्भावनेसाठी तिरंगा यात्रा : यशवंत कांबळे
![Tricolor Yatra of 'AAP' in Pimple Saudagar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/AAP-Pimple-Saudagar-780x470.jpg)
पिंपळे सौदागर मध्ये ‘आप’ची तिरंगा यात्रा
पिंपरी : आमच्यासाठी प्रजासत्ताक दिन हा खुप महत्वाचा आणि अभिमानाचा विषय आहे. सामाजिक न्याय, समता वृद्धिंगत व्हावी. धर्मनिरपेक्ष कल्याणकारी विचाराने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश सकल जनांमध्ये प्रसारित करण्यासाठी तिरंगा यात्रेचा उपक्रम राबवण्यात येत आहे, असे आम आदमी पार्टी चिंचवडचे कार्यकारी अध्यक्ष यशवंत कांबळे म्हणाले.
आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडच्या वतीने काळेवाडी येथील कोकणे चौक, शिवार चौक, गोविंद गार्डन येथून तिरंगा यात्रा काढण्यात आली. यामध्ये आम आदमी महिला, युवक, विद्यार्थी आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
यावेळी, चेतन बेंद्रे, राज चाकणे, यशवंत कांबळे, ब्रम्हानंद जाधव, मनोहर पाटील, संदीप देवरे, सुरेश भिसे, संतोषी नायर, मीनाताई जावळे, सरोज कदम, विजया मानमोडे, स्वप्नील जेवळे, अजय सिंग, सुरेंद्र कांबळे, इम्रान शेख, दत्तात्रय काजळे, वाजीद शेख, शशिकांत कांबळे, संजय मोरे, रोहित सरनोबत, यल्लपा यालदोर,आशुतोष शेळके आदी कार्यकर्त्यांनी यात्रेचे संयोजन केले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/image-29-1024x768.png)