गणेशभक्तांसाठी खूशखबर, चार दिवस कोकणात टोलमुक्त प्रवास
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/toll.jpg)
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. मुंबईहून कोकणात जाण्यासाठी ११ ते १४ सप्टेंबरपर्यंत टोल फ्री प्रवास करता येईल, अशी घोषणा एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
गणेशोत्सवासाठी गणेशभक्त मोठ्या प्रमाणात कोकणात जातात. या गणेशभक्तांना राज्य सरकारने गुरुवारी दिलासा दिला. मुंबईहून कोकणात जाण्यासाठी ११ ते १४ सप्टेंबरपर्यंत टोल फ्री प्रवास करता येणार आहे. कोल्हापूर मार्गे हा टोल फ्री प्रवास करता येणार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. परतीचा प्रवासही टोल फ्री होणार असल्याचे त्यांनी सांगितले. छोट्या वाहनांसाठीच टोल माफ केला जाणार आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात गौरी गणपतीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई- गोवा महामार्गावरील खारेपाटण ते झाराप या मार्गाची पाहणी केली होती. गणपती उत्सवाच्या काळात येणाऱ्या चाकरमान्यांचा व वाहतूक खेळखंडोबा होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश त्यांनी बांधकाम अधिकाऱ्यांना दिले होते.