“नवनीत अक्काच्या नावापुढे खान, शेख, तांबोळी असं नाही म्हणुन त्या गाण्याची चर्चा होत नाही का?”; सुषमा अंधारे
![Navneet Rana's name doesn't have Khan, Shaikh, Tamboli, so isn't that song being discussed?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/navneet-rana-and-sushma-andhare-780x470.jpg)
रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा का दाखल झाला नाही?
मुंबई : सध्या पठाण नावाच्या चित्रपटातील एका गाण्यावरून बराच वाद, चर्चा होत आहे. या गाण्यात अभिनेत्री दीपीका पुदकोणच्या च्या गाण्यात खान नावाचा कलाकार आहे म्हणून गाण्यावर आक्षेप घेतला जात आहे का? पण तशाच भगव्या रंगाची साडी घालून आमच्या नवनीत अक्कानी पण डान्स केला आहे. पण नवनीत अक्काच्या त्या गाण्याची चर्चाच होत नाही का बरं? नवनीत अक्काच्या नावापुढे खान, शेख, तांबोळी असं काहीच नाही म्हणून का? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
माफ कर मी जास्त स्पष्ट आहे. कारण मला पॉलिटिकली करेक्ट राहण्यापेक्षा सोशली करेक्ट राहणे जास्त योग्य वाटते. क्युकी मेरा जमीर जिंदा है, मै मुर्दा नही हू, असं सांगत असतानाच सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोशळ मीडियावर व्यक्त होताना काय काळजी घ्यावी याचेही मार्गदर्शन केले.
मागच्या दोन अडीच वर्षात विरोधकांनी चुकीचं नरेटीव्ह लोकांना सांगितले. पण त्यात तथ्य आहे का? हे कुणी तपासलेच नाही. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षामधील दोन वर्ष करोनातच गेली. त्यावेळी घरातून बाहेर पडायला सर्वांवर बंधने होती.
सोबतच, मध्यंतरी योगगुरू रामदेव बाबा यांनी महिलांच्या कपड्यावरून आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधानाचाही अंधारेंनी चांगलाच समाचार घेतला. महिलांनी कपडे परिधान केले नाही. तरीही त्या चांगल्या दिसतात, असं विधान रामदेव बाबांनी केलं होतं. यावेळी मंचावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. या प्रकरणानंतर रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा का दाखल झाला नाही? असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला.