Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

दहावी- बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Share On

21 फेब्रुवारीपासून बारावीची तर 2 मार्च 2023 पासून दहावीची परीक्षा

पुणे : दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ले जाहीर केले आहे. बारावीची परीक्षा मंगळवार 21 फेब्रुवारी ते मंगळवार २१ मार्च 2023 या काळात होणार आहे, तर दहावीची परीक्षा गुरुवार 2 मार्च ते शनिवार 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे.
यंदा परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमांवर होणार आहेत. जादाचा वेळ मिळणार नाही. करोनापूर्वी जशा परीक्षा होत होत्या तशाच परीक्षा होणार आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षेच्या अनुषंगाने आधीच तयारी सुरू केली होती. करोनानंतर नियमित परीक्षा होत असल्याने, परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्थेची मंडळाकडून चाचपणी करण्यात आली. आठ डिसेंबरपासून पुन्हा जिल्हानिहाय बैठकांचे नियोजन करण्यात आले होते. विभागात दहावी, बारावी परीक्षेसाठी नोंदणी संख्या वाढली आहे.
यापुर्वी, करोना प्रादुर्भावामुळे २०२१ ची दहावी, बारावी परीक्षा झाली नव्हती. त्यासाठी अंतर्गत मूल्यमापन गुणदान करण्यात आले होते. २०२२ मध्ये करोनाचा प्रादुर्भाव कायम होता. परीक्षा घेण्यात आली, परंतु शाळा तेथे केंद्र, २५ टक्के अभ्यासक्रम कमी, अधिकचा वेळ असे बदल मंडळाने केले होते. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षेच्या अनुषंगाने आधीच तयारी सुरू केली होती. करोनानंतर नियमित परीक्षा होत असल्याने, परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्थेची मंडळाकडून चाचपणी करण्यात आली. आठ डिसेंबरपासून पुन्हा जिल्हानिहाय बैठकांचे नियोजन करण्यात आले होते. विभागात दहावी, बारावी परीक्षेसाठी नोंदणी संख्या वाढली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button