भारती विद्यापीठ परिसरात दहशत माजवणाऱ्यांना पोलिसांचा बेदम चोप
नागरिकांनी केले पोलिसांचे कौतुक
पुणे : भारती विद्यापीठ व सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी मध्यरात्री दोन गुंड हातात कोयता घेऊन स्थानिक नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून आपली दहशत निर्माण होईल असे वागत होते. त्याबद्दल नागरिकांनी पोलीस कन्ट्रोल रूमला फोन केल्यावर जवळील मार्शलचे पोलीस तत्परतेने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दहशत निर्माण करणाऱ्या दोघांपैकी एकाला पाठलाग करून पकडले आणि बेदम चोप दिला.
सिंहगड लॉ कॉलेज रोडवर काल दोन तरुणांनी हातात चाकू सुरे घेऊन परिसरातील दुकानांमध्ये जाऊन अनेक लोकांना भोसकले. रस्त्यात जो दिसेल त्याला चाकू दाखवून भीती दाखवली जात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्यात एक जण जखमी देखील झाला आहे. जखमी झालेल्या तरुणाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी या दोघांना पाठलाग करुन पकडले, मात्र यातील एकाने पळ काढला. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो अल्पवयीन असल्याचे समजते दुसऱ्या आरोपीचे नाव करण दळवी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला. या घटनेत पोलिसांनी दाखवलेली ततपरता यामुळे पोलीस दलातील या जवानांचे कौतुक करण्यात येत आहे. एवढेच नाही त्या दोन पोलिस कर्मचाऱ्याचा सत्कार करण्यासाठी थेट सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये नागरिक पोहचले. त्यापैकी कात्रज च्या नगरसेविका मनीषा राजाभाऊ कदम यांनी या जवान पोलीस अंमलदार यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.