Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रमुंबई
“आता RSS च्या कार्यालयावर ताबा मिळवायला गेलेले का?”; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
![Has the RSS gone to take control of the office now? So said Uddhav Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/uddhav-thackeray-780x470.jpg)
महाराष्ट्रात टोळ्यांचं राज्य आलंय की काय असं वाटत आहे
नागपुर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरातील आरएसएसच्या कार्यालयाला भेट दिली. यावरून मिंधे सरकार RSS च्या कार्यालयावर ताबा मिळवायला गेलेले का? असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरएसएस कार्यालयातून बाहेर पडले असावेत. पण मोहन भागवतांना मी विचारतोय की कार्यालयाचा कोपरान् कोपरा तपासून बघा. कुठे लिंब टाकलेत का तेही बघून घ्या.कदाचित आज आरएसएसच्या कार्यालयातही ते ताबा घेण्यासाठीच गेले असतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
यांची बुभुक्षित नजर आहे. ती फार वाईट आहे याचा आम्ही अनुभव घेतला आहे. जे काही चांगलं असेल, ते आपण नाही करू शकत तर त्याचा कब्जा कसा घ्यायचा ही त्यांची वृत्ती आहे. त्यामुळे आरएसएसनंही यावर काळजी घेण्याची गरज आहे. कुठेही जायचं आणि ते बळकवायचा प्रयत्न करायचा. जणूकाही महाराष्ट्रात टोळ्यांचं राज्य आलंय की काय अशी भावना सामान्यांमध्ये यायला लागली आहे. काल त्यांनी आमच्या पालिकेतल्या कार्यालयाचा ताबा घ्यायचा प्रयत्न केला. आज ते आरएसएसच्या कार्यालयात गेले होते. आरएसएस मजबूत आहे म्हणून ते ताबा घेऊ शकले नसतील. पण आरएसएसनं काळजी घ्यायची गरज आहे, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला.
यासोबतच, काल मुंबई महापालिकेत मिंधे गट गेला होता. ज्यांच्यात कर्तृत्व नसतं, स्वत: काही निर्माण करण्याची ताकद नसते ते सरळ सरळ चोऱ्या करतात किंवा दुसऱ्यांच्या गोष्टींचा ताबा घेतात. शेवटी हा मानसोपचार तज्ज्ञांना विचारण्याचा विषय आहे. काहींच्या मनात न्यूनगंड असतो की आपण काही करू शकत नाहीये. काहीतरी केलं तर पाहिजे. त्या न्यूनगंडाची जाणीव असते. मग ते न्यूनगंडाचं रुपांतर अहंगंडात करतात. दुसऱ्यांचे नेते, पक्ष, ऑफिस बळकवायचं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.