“परमबीर सिंह यांनी माझ्यावर 100 कोटींच्या वसुलीचे खोटे आरोप केले”; अनिल देशमुख
![Anil Deshmukh said that Parambir Singh falsely accused me of recovery of 100 crores](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/anil-deshmukh-1-1-780x470.jpg)
अनिल देशमुखांची तुरूंगाबाहेर येताच पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
माजी मंत्री अनिल देशमुख हे तब्बल १३ महिन्यानंतर जेलबाहेर
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर तुरुंगातून बाहेर आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आलं. परमबीर सिंह यांनी माझ्यावर 100 कोटींच्या वसुलीचे खोटे आरोप केले नंतर त्यांनीच चांदीवाल आयोगाकडे प्रतीज्ञापत्र सादर करत म्हटलं की, जे आरोप केले आहेत ते ऐकीव माहितीवर केले याबाबत माझ्याकडे पुरावे नाहीत, असं वक्तव्य अनिल देशमुख म्हणाले.
माजी मंत्री अनिल देशमुख हे तब्बल १३ महिन्यानंतर जेलबाहेर आले. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
सोबतच, अनिल देशमुख कुटुंबावर तब्बल १०९ वेळा रेड टाकून ईडी सरकारने वर्ल्ड रेकॉर्ड केलं आहे. देशमुख यांच्यावर या ईडी सरकारकडून खोटे आरोप करण्यात आले. कोर्टाच्या आर्डरमध्ये कुठलाही पुरावा त्यांच्याविरोधात सापडलेला नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने तर वर्ड रेकॉर्ड केलंय. अनिल देशमुख आणि त्यांच्या कुंटुबांवर तब्बल १०९ वेळा रेड टाकण्यात आली. एवढ्या वेळा रेड करावी लागली याचा अर्थ त्यांना काहीही सापडले नाही. याबाबतची नोंद देखील कोर्टाच्या आर्डरमध्ये आहे’, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे म्हणाल्या.
आमचे सहकारी अनिल देशमुख मागील अनेक दिवसांपासून तुरूंगात होते. आज ते बाहेर आले आहेत. त्यामुळे आम्हाला सर्वांना आनंद झाला आहे. हे प्रकरण नेमकं कसं घडलं? याचं सत्य आता लोकांसमोर येईल, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले.