Breaking-newsपुणे
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; २ जण जागीच ठार, एक गंभीर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/6eef52c5-ede3-4a7d-9.jpg)
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मंगळवारी दुपारी भीषण अपघात झाल्याचे वृत्त असून यामध्ये २ जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. यातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत, मात्र, अधिक माहिती कळू शकलेली नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर कामशेत बोगदयाजवळ दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगात असणाऱ्या कारने मागून धडक दिली. ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात येत होती. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे. कामशेत पोलीस याचा तपास करीत आहेत.