घटस्फोटानंतर हनी सिंग च्या आयुष्यात नव्या गर्लफ्रेंडची एन्ट्री?
![Entry of new girlfriend in Honey Singh's life after divorce?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/543485-honey-singh-new-girlfriend-viral-video.webp)
प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंग गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. घटस्फोटानंतर हनीच्या आयुष्यात नव्या महिलेची एन्ट्री झाल्याची चर्चा रंगली आहे. ही महिला दुसरी तिसरी कोणीनसून सुपर मॉडेल टीना थडानी आहे. सध्या हनी आणि टीनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमुळे टीना आणि हनी दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
व्हिडीओमध्ये हनी आणि टीना एकमेकांचा हात धरुन चालताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओवर अनेक चाहत्यांच्या कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे. काही महिन्यांपूर्वीच यो यो हनी सिंग या सुप्रसिद्ध रॅपरचा घटस्फोट झाला आहे. त्यानंतर यो यो हनी सिंगचं कुणाला डेट करतोय का अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातून आता नव्याने व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा हनी सिंगच्या गर्लफ्रेंडच्या चर्चांना उधाण आलं आहे.
हनी आणि टीनाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही चाहत्यांनी आनंद व्यक्त केला, तर काहींनी मात्र हनीला ट्रोल केलं आहे. दोघांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने ‘नवीन गर्लफ्रेंडची ओळख करुन द्यायची होती म्हणून घटस्फोट झाला.’ तर दुसऱ्या युजरने, ‘पत्नी बरोबर बोलत होती…’ असं कमेंट करत लिहिलं आहे.
हनी सिंगचं घटस्फोट
हनी सिंगने 2011 मध्ये शालिनी तलवारशीलग्न केले होते. 2022 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. शालिनीने हनी सिंगवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता आणि गेल्या महिन्यात त्यांचा घटस्फोट झाला होता. रिपोर्टनुसार, हनी सिंगने शालिनीला पोटगी म्हणून एक कोटी रुपये दिले.