Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

जुळ्या बहिणींच्या लग्नात पुन्हा विघ्न… तिसरीची एन्ट्री; आता नवीच माहिती आली समोर

Share On

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

जुळ्या बहिणींसोबत विवाह करणाऱ्या तरूणाचा आधीही विवाह झाला होता, अशी धक्कादायक माहितीसमोर आली आहे. तरुणाच्या पहिल्या पत्नीने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. यामुळे जुळ्या मुलींच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

मुंबई: एका तरुणाने जुळ्या बहिणींशी विवाह केला व सर्वांच्याच भुवया उंचवल्या. दोन मुलींशी एकाच वेळी विवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. पहिल्या पत्नीचे निधन झाले किंवा घटस्फोट झाला तरच दुसरा विवाह करता येतो. त्यामुळे जुळ्या बहिणींशी विवाह करणे तरुणाच्या अंगलट आले.

पोलिसांत याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली. याचा गुन्हाही नोंदवण्यात आला. महिला आयोगानेही याची दखल घेतली. याचा तपास सुरु झाला. सोशल मिडियावरही याची चर्चा चांगलीच रंगली. आता या प्रकरणात नवीन वळण आले आहे. हे नवीन वळण मुलींच्या कुटुंबियांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

जुळ्या बहिणींसोबत विवाह करणाऱ्या तरूणाचा आधीही विवाह झाला होता, अशी धक्कादायक माहितीसमोर आली आहे. तरुणाच्या पहिल्या पत्नीने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. यामुळे जुळ्या मुलींच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

माळेवाडी अकलूज येथील हॉटेल गलांडे येथे गेल्या आठवड्यात अतुल आवताडे याने कांदिवली येथील रिंकी व पिंकी या जुळ्या बहिणींशी एकाच वेळी विवाह केला. असा विवाह करुन अतुलने द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले. रिंकी व पिंकी या आयटी क्षेत्रात मोठ्या पगारावर नोकरी करतात. याप्रकरणी माळेवाडी-अकलूज येथीलच राहुल फुले या युवकाने अकलूज पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.

या विवाहाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. याप्रकरणी तातडीने चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोलापूर पोलीस अधीक्षकांना दिले. भारतीय दंड संहितेच्या कलम ४९४ प्रमाणे हा गुन्हा आहे. केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ चे कलम १२ (१) व १२ (२) अन्वये तात्काळ सादर करावा, असे रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना दिलेल्या आदेशात म्हटले.

पत्नीचे निधन झाले अथवा घटस्फोट झाला तरच दुसरा विवाह करता येतो. अतुलने एकाचवेळी दोन मुलींशी विवाह केला. याला कायद्याने मान्यता नाही. त्यात आता अतुलच्या पहिल्या पत्नीने महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. पहिल्या पत्नीसोबत अतुलने घटस्फोट घेतला होता की नाही हे पोलीस तपासात स्पष्ट होईल. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट न घेता जुळ्या बहिणींशी विवाह केला असल्यास अतुलविरोधात गंभीर गुन्हाची नोद होऊ शकते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button