पाकिस्तानातील दोन कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/USA-America-Pakistan.jpg)
वॉशिंग्टन – पाकिस्तानातील दोन कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध घातले आहेत. टेक्नोलॉजी लिंक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि टेक्नोकेअर सर्व्हिसेस एफझेड अशी या दोन कंपन्यांची नावे आहेत. “एक्सपोर्ट ऍडमिनिस्ट्रेशन रेग्युलेशन’ च्या निर्यातदारांच्या काळ्या यादीमध्ये या कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या कंपन्या अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि विदेश धोरणात अमेरिकेच्या हितसंबंधांविरोधात कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे प्रांतिय अधिसूचनेमध्ये म्हटले आहे. अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ हे आगामी काही दिवसात पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वीच पाकिस्तानातील या दोन कंपन्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
या कंपन्या आण्विक आणि क्षेपणास्त्राशी संबंधित साहित्य निर्यातीचा परवाना नसताना पाकिस्तानमध्ये निर्यात करण्यामध्ये सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.